Rani Mukherjee to Sign a New Film After 6 Yrs Long Break

News By Omkar Walambe,Omkar-Walambe,Rani Mukherjee to Sign a New Film After 6 Yrs Long Break
By: Omkar Walambe Knowledge Center
 
Jan. 28, 2013 - PRLog -- मुंबई, दि. २५ - राणी मुखर्जीच्या करिअरची गाडी सध्या रुळावर नाही. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या अय्यानंतर तिला एकाही निर्मात्याने आपल्या चित्रपटासाठी साईन केलेले नाही. सध्या बेरोजगार असलेल्या राणीला करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने आपल्या आगामी चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला आहे. बॉम्बे टॉकिज या चित्रपटात रणदीप हुडासोबत राणीला साईन करण्यात आले आहे. असे झाले तर तब्बल सहा वर्षांनी राणी करण जोहरच्या चित्रपटात काम करताना दिसेल. करण जोहरच्या कभी अलविदा ना कहेना या चित्रपटात तिने सहा वर्षांपूर्वी काम केले होते. राणीच्या करिअरला गती देण्यात करणची मोठी भूमिका होती. त्याच्याच कुछ कुछ होता है या चित्रपटात एका लहानशा भूमिकेत चमकलेल्या राणीला या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. करण गेल्या काही दिवसांपासून त्याच्या स्टूडंट ऑफ द इअरमध्ये बिजी होता; पण आता त्याने आपल्या नव्या प्रोजेक्टस्वर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय चित्रपट उद्योगाच्या शंभर वर्षानिमित्त काही दिग्दर्शक विशेष चित्रपट तयार करत आहेत. बॉम्बे टॉकिजही त्यापैकीच एक आहे.
End
Source:Omkar Walambe Knowledge Center
Email:***@measurementsystemsindia.com Email Verified
Zip:412105
Tags:Omkar Walambe, Mass Flow, Measurements Of Liquids, Amruta-Walambe
Industry:Lifestyle, Fashion
Location:Mumbai - Maharashtra - India
Account Phone Number Verified     Disclaimer     Report Abuse
MEASUREMENT SYSTEMS OF LIQUIDS AND GASES News
Trending
Most Viewed
Daily News



Like PRLog?
9K2K1K
Click to Share